दिल्ली येथे खासदार किरसान यांची काँग्रेस नेते रामदास मसराम यांनी घेतली भेट.. गडचिरोली जिल्ह्यातील समस्या सोडविण्याबाबत केली चर्चा....
उद्रेक न्युज वृत्त
देसाईगंज(गडचिरोली) :-राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे नववे राष्ट्रीय अधिवेशन ७ ऑगस्टला पंजाबमधील अमृतसरच्या गुरुनानक देव विद्यापीठाच्या ज्युबिली कन्व्हेन्शन सेंटरमध्ये आयोजित करण्यात आले होते.या अधिवेशनाला गडचिरोली जिल्ह्यातील मोठ्या प्रमाणावर ओबीसी बांधवांनी हजेरी लावली. अधिवेशनाला आरमोरी विधानसभा क्षेत्रातील देसाईगंज,कुरखेडा,कोरची व आरमोरी तालुक्यातील तालुकाध्यक्षांसह काँग्रेस नेते रामदास मसराम यांनीही उपस्थिती दर्शवित दिल्ली येथे गडचिरोली-चिमूर लोकसभा निर्वाचन क्षेत्राचे खासदार डॉ.नामदेव किरसान यांची
भेटी दरम्यान गडचिरोली जिल्ह्यातील मोदी आवास योजनेतील लाभार्थ्यांचे रखडलेले अनुदान,रोजगार हमी योजनेच्या मजुरांची मजुरी,निराधार योजनेचे अनुदान,अतीवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे झालेले नुकसान व इतर समस्या संदर्भात चर्चा करून तातडीने सोडविण्यात याव्यात; अशी मागणी केली आहे.प्रसंगी खासदार किरसान यांनी याबाबत संसदेत लक्षवेधून शक्य तितक्या लवकर समस्यांचे निराकरण करण्यात येणार असल्याचे म्हटले आहे.